कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता! 

आरोग्य यंत्रणा सतर्क, मात्र शाळा सुरू होण्याबाबत दक्षिण रायगड संभ्रमित 

माणगांव (राजन पाटील) : संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट येऊन कोरोनाच्या प्रादुर्भावाने त्रस्त होताना विशेषतः भारतात दिल्लीत दुसऱ्या लाटेचा प्रभाव जाणवू लागल्याने आता संपूर्ण भारतात आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने यापूर्वी दिवाळी नंतर शाळा सुरु होण्याला हिरवा कंदील देऊन तशा प्रकारचे परिपत्रक काढले व २३ नोव्हेंबर पासून शाळा सुरु करण्याचा  निर्णय घेतला मात्र शासन कोणत्याही प्रकारची जबाबदारी न स्वीकारता स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय करावा असे सूतोवाच करताच  राज्यातील प्रथम मुंबई व त्यापाठोपाठ ठाणे व अन्य महापालिकांनी शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेताच रायगड जिल्ह्यातील उत्तर रायगडातील पनवेल महानगरपालिकेने शाळा सुरु न करण्याचे आदेश दिले मात्र दक्षिण रायगडातील शाळा सुरू करण्याबाबत शासनाने स्थानिक पातळीवर व प्रशासनाच्या जबाबदारीवर टाकल्याने तसेच शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचा आदेश न आल्याने शाळा प्रशासन व शिक्षक कोविडची चाचणी करूनही संभ्रमित आवस्थेत आहेत. 

खर तर इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी या वर्गांच्या विद्यार्थ्यांचे वर्ष महत्त्वाचे समजून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याच्या हेतूने शिक्षकांसह शाळा प्रशासनाने तयारी केली. पालकांची संमतीही घेतली. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रतिबंधक लस तयार नसल्याने त्यातच अन्य जिल्ह्यात शिक्षकच कोरोनादर्षक सापडत असल्याने शिक्षण विभागाने याची दखल घेण्याची गरज आहे. खरं तर शिक्षणावर व आपल्या व्यवसायावर निष्ठा तसेच नितांत सुंदर प्रेम करणारे व शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या हेतूने विचार करणारे शिक्षक शाळा सुरु होण्याचा मनोदय व्यक्त करत होते. पण कोरोनाच्या प्रादुर्भावाने शिक्षक व शिक्षक संघटनाही हतबल झाल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog