माणगांवमधील निजामपूर रोडवरील कोकण रेल्वेचा ब्रिज ठरतोय जीवघेणा, वाहतुकीस अडथळा! 

माणगांव (राजन पाटील) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना मुंबई-पुण्याहून पर्यटनासाठी म्हसळा, श्रीवर्धनकडे येणारे पर्यटक विळे-भागाड येथे असलेल्या पोस्को कंपनीच्या बसेस व स्थानिक वाहतूकीमुळे माणगाव शहरातील निजामपूर रोड नेहमी वाहतुकीने गजबजलेला असतो. त्यातच निजामपूर रोडवरील कोकण रेल्वेच्या ब्रिजजवळील एकीकडील रस्ता खराब असल्याने दूचाकीस्वार व चार चाकी वाहने कधी-कधी एकीकडील चांगल्या  रस्त्याच्या बाजूने वळवतात. वाहतूकीच्या विरूद्ध बाजूने वाहन चालवल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यातच या कोकण रेल्वेच्या ब्रिजवर दिशादर्शक, धोकादायक सूचना नसल्याने रात्री अपरात्री एखादा वाहन रेल्वे ब्रीजच्या मधल्या स्तंभाला आदळून मोठा अपघात होऊ शकतो.  तसेच या कोकण रेल्वे पुलाची उंची कमी असल्याने अवजड व उंची ने जास्त असणाऱ्या वाहनास त्याचा अडथळा होऊ शकतो. या सर्व समस्या लक्षात घेऊन कोकण रेल्वे व सार्वजनिक बांधकाम खात्याने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी स्थानिक लोकांकडून होत आहे.

Popular posts from this blog