खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतील पक्ष संघटना तयार करणार! 

- जिल्हा युवती अध्यक्षा सायली दळवी



रोहा (रविना मालुसरे) :

राष्ट्रवादी युवती काँग्रेस रायगड जिल्ह्याची धुरा हाती घेतल्यानंतर अॅड. सायली दळवी यांनी पक्ष संघटना वाढविण्याच्या कामाला सर्वत्र जोरदार सुरुवात केली आहे. त्यासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यातील तालुकानिहाय बैठक तरुण-तरुणींना पक्षाची भूमिका, धोरण पटवून देत आहेत. अलिबाग तालुक्याची पक्षाची बैठक राष्ट्रवादी भवन अलिबाग येथे अलिबाग तालुका अध्यक्ष श्री. दत्ता ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा युवती अध्यक्षा अॅड. सायली दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली. सदर बैठकीला सौ. प्रतीक्षा राऊत (महिला अध्यक्षा) धनंजय कवटेकर (उपाध्यक्ष) हेमनाथ खरसाबळे (युवक अध्यक्ष) मनोज शिर्के, सरिता भगत (शहर अध्यक्षा) प्रिया ढवळे, राजन तांडेल, शैलेश चव्हाण, समिता गुरव, मिनाक्षी खरसाबळे हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करीत असताना खासदार सुनीलजी तटकरे व माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष श्री. सुरेशभाऊ लाड यांच्या संकल्पनेतील पक्ष संघटना करण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन व अलिबाग  तालुक्यातील पक्ष संघटना अधिक चांगल्या प्रकारे बळकट करण्याकडे भर दिला जाईल. यासाठी अलिबाग तालुक्यातील कार्यकर्त्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली.

एक महिला युवती पालकमंत्री म्हणून आदीतीताई तटकरे आमच्या पाठीशी असल्यामुळे एक महिला दुसऱ्या महिलेचे प्रश्न तातडीने जाऊन घेऊ शकते. त्यामुळे  पुढे जाऊन आदीतीताई ताईंच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध राहीन, तसेच महिला सक्षमीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर महिलांचा राष्ट्रवादी पक्षात सहभाग वाढेल. महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पालकमंत्री आदीतीताई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात राबविण्यात येणार असून त्याचा जास्तीत जास्त फायदा महिला वर्गाला देण्याचा मानस आहे. पालकमंत्री आदीतीताई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील युवतीचे तालुका निहार्य संघटना मजबूत व बळकट करून युवतीना पद देऊन त्याच्यावर जबाबदारी टाकण्यात येईल.

अलिबाग तालुक्यातील बैठकी मध्ये युवती सेल च्या विविध पदांसाठी तरुणीच्या मुलाखती घेण्यात आल्या व युवतींना लवकर संघटनेच्या कामासाठी सक्रिय करण्यात येईल असे मत युवती जिल्हध्यक्षा अॅड. सायली संजय दळवी यांनी व्यक्त केले.

Popular posts from this blog