माणगांव तहसिल कार्यालयात प्रचंड गैरप्रकार, नुकसानग्रस्त कुटूंब मदतनिधीपासून वंचित 

'चहा पाणी' न दिल्याने नुकसानग्रस्तांची नावेच खोडली?

माणगांव तहसिलदार करीत आहेत जनतेची दिशाभूल!


माणगांव (प्रतिनिधी) : निसर्ग चक्रीवादळामध्ये नुकसान झालेल्या माणगांवमधील गजानन महाराज नगर येथील कुटूंबांना अद्यापही मदतनिधी मिळाली नसल्याने माणगांव तहसिल कार्यालयाची अकार्यक्षमता स्पष्ट दिसू लागली आहे. मात्र असे असतानाही माणगांव तहसिलदार प्रियंका आयरे-कांबळे यांनी एका वृत्तपत्रामध्ये चुकीचे व दिशाभूल करणारे वृत्त प्रसिद्ध केले असून त्यामध्ये त्यांनी माणगांव तहसिल कार्यालय मदतनिधी वाटपात अव्वल असल्याचे हस्यास्पद वक्तव्य केले आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र चक्रीवादळात नुकसान झालेले अनेक कुटूंब मदतनिधीपासून वंचित राहिलेले असून सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही मदतनिधी मिळविण्यासाठी तहसिल कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. 

माणगांवच्या गजानन महाराज नगरमधील काही कुटूंबांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. मात्र तहसिल कार्यालयात वारंवार हेलपाटे मारून देखील त्यांना मदतनिधी मिळालेली नाही. परिणामी माणगांव तहसिल कार्यालयाच्या अकार्यक्षमतेबाबत या परिसरात संतापाची लाट पसरली आहे. 

माणगांव तहसिल कार्यालयातील अधिकाऱ्यांना 'चहा पाणी' न दिल्याने गजानन महाराज नगरमधील काही नुकसानग्रस्त कुटूंबांना मदतनिधी मिळाली नसल्याचे नुकसानग्रस्त कुटूंबियांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे नुकसान झालेल्यांना मदतनिधी मिळू नये म्हणून माणगांव तहसिल कार्यालयातील अधिकाऱ्यांनी व नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करणारे शिक्षक कर्मचारी यांनी एकत्रितपणे कारस्थान केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आलेली असून पंचनामा करण्यात आलेल्या नागरिकांची नावे खाडाखोड करून गायब करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामुळे माणगांव तहसिल कार्यालयातील गैरप्रकार चव्हाट्यावर आलेला आहे.

Popular posts from this blog