रेवदंडा पोलीसांमुळे झाली माय-लेकाची भेट

रायगड (किशोर केणी) :

दिनांक ७ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील मांडला या गावी एक वृद्ध महिला फिरत असल्याबाबतची माहीती रेवदंडा पोलिसांना मिळाल्याने लागलीच रेवदंडा पोलीस ठाण्याकडील बिट मार्शल व दामिनी पथकाचे कर्मचारी यांनी मांडला या गावी जावून वृद्ध महीला हिचा शोध घेऊन तिला पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. जैतापुरकर व त्यांचे कडील पोलीस स्टाफ यांनी सदर महिलेस विश्वासात घेवून तिच्याकडे आस्थेवाईकपणे विचारपुस केली असता सदर महिला हिने तिचे नाव प्रतिमा प्रकाश घाग रा. वाकीपाडा, वसई असे सांगितले. सदर महिलीने दिलेल्या माहितीवरून पोलीस ठाणे येथील महिला सहाय्यक फौजदार गोसावी, महिला पोलीस नाईक/१८५ पुळेकर, यांनी जिल्हा पालघर कंट्रोल रूम येथे संपर्क साधून वसई पोलीस ठाण्याचे फोन नंबर प्राप्त करून सदर वृद्ध महिलेची माहीती दिली असता, वसई पोलिसांनी सदरचा पत्ता हा वाळीव पोलीस ठाणे हद्दीत येत असल्याचे सांगितले. महिला कर्मचारी यांनी वाळीव पोलीस ठाण्याचे फोन नंबर प्राप्त करून वाळीव पोलीस ठाणे येथे वृद्ध महिले बाबत चौकशी केली असता सदर वृद्ध महीला ही फेबुवारी/२०२० रोजी पासून मिसिंग असल्याबाबत सांगितले व सदर वृद्ध महिलेच्या मुलाचा संपर्क नंबर दिला. त्यानंतर सदर वृद्ध महिलेच्या मुलास पोलीस निरीक्षक श्री. जैतापूरकर यांनी संपर्क साधून रेवदंडा पोलीस ठाण्यात बोलाऊन त्याच्याकडे योग्य ती चौकशी करून सदर वृद्ध महिला प्रतिमा प्रकाश घाग ह्या त्यांची आई असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांस सुखरूप त्यांचा मुलगा कृष्णा प्रकाश घाग याच्या ताब्यात दिले. रेवदंडा पोलीसांच्या या कार्यामुळे वृद्ध महिलेचा मुलगा कृष्णा प्रकाश घाग याने रेवदंडा पोलिसांचे आभार मानले.


Comments

Popular posts from this blog