सुप्रीम कोर्टात २ आठवड्यात सुरू होऊ शकते प्रत्यक्ष उपस्थितीत कामकाज


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना महामारीचा संसर्ग मोठ्या वेगाने पसरू लागला आहे. सुरुवातीला याला अटकाव घालण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्याचा परिणाम न्याय व्यवस्थेवरही झाला. त्यामुळे न्याय व्यवस्थेचे कामकाज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू करावे लागले होते. आता पुन्हा पूर्वी प्रमाणे कामकाज सुरू करण्याबाबत ७ सदस्यीय समितीने महत्त्वाचा निर्णय सूचित केला आहे.

प्रत्यक्ष न्यायालयातून कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सात न्यायाधीशांच्या समितीने दैनंदिन सुनावणी घेण्यासंदर्भात म्हटले आहे की, ज्या दीर्घकालीन प्रकरणांची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे, अशा प्रकरणांची सुनावणी न्यायालयातून सुरू करावी. यासाठी तीन न्याय कक्षाचा वापर केला जावा, या सुनावण्या पुढील १० ते १५ दिवसानंतर सुरू करता येतील, असे या समितीने सूचित केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने न्यायालयातून प्रत्यक्ष उपस्थितीत न्यायदान करण्याचे कामकाज गेल्या २० मार्चपासून थांबविण्यात आले आहे. सध्या स्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतली जात आहे. समितीने सूचित केल्यानुसार सुनावणीसाठी न्यायालयात जातील त्यांनी नियमांचे पालन करावे. एकावेळी मोजक्याच वकिलांची संख्या उपस्थित असावी, फिजिकल डिस्टन्स पाळावे. 


Comments

Popular posts from this blog