हि. म. मेता माध्यमिक विद्यालय विळे शाळेचा दहावीचा निकाल 96.87 %


पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) :
माणगांव तालुक्यातील भैरवनाथ ज्ञान प्रसारक मंडळ संचालित हिरालाल महादेव मेता विळे शाळचा इ. 10 वी चा निकाल 96.87 % लागला असून शाळेतून एकूण 32 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यामधील 31विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 9 विद्यार्थी विशेष श्रेणीत तर 13 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 07 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर उत्तीर्ण श्रेणीत 02  विद्यार्थी असून 1) कु. साहिल सोपान सुतार 91.40% गुण प्राप्त करून प्रथम आला. प्रथमेश गणेश कानाडे - ८५.४० % गुण प्राप्त  करुन दुसरा आला. अक्षता जालंदर घोरपडे  व आदित्य दिनेश धावडे यांना ८४.४० % गुण मिळवून तृतीय क्रमांक आला. सर्व यशस्वी विद्यार्थांचे व मुख्याध्यापक, शिक्षकांचं शाळासमिती व संस्था यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
भैरवनाथ ज्ञान प्रसारक मंडळ विळे यांच्या वतीने विळे येथे दहावीच्या बोर्डाची स्थापना केल्याला पाच वर्ष पूर्ण झाले असून याचा लाभ या परिसरातील चार शाळेचे विद्यार्थी घेतात. यापूर्वी या शाळांतील विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा देण्यासाठी निजामपूर येथे जावे लागत होते. विळे बोर्ड झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा व श्रम बचत झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक समाधान व्यक्त करीत असून त्यांनी भैरवनाथ ज्ञान प्रसारक मंडळ विळे यांना धन्यवाद देत आहेत.

Popular posts from this blog