सीबीएसई बारावी परीक्षेत सानिका भोईरचे उज्ज्वल यश


रोहा (समीर बामुगडे) :
रोहे तालुक्यातील देवकान्हे गावची सुकन्या कु. सानिका विठोबा भोईर हिने सीबीएसई बारावी परीक्षेत ८३.०३ % इतक्या गुणांची कमाई करून उज्ज्वल यश संपादित केले आहे.

जवाहर नवोदय विद्यालय निजामपूर,माणगांव येथे शिक्षण घेऊन तिने हे नावलौकिक प्राप्त केले आहे. तर दहावी परीक्षेमध्येही तिने ९५.८० % इतके गुण प्राप्त केले होते. प्रचंड जिद्दी व महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या सानिकाने अभ्यासाबरोबरच सर्वच क्षेत्रात आपली चुणूक दाखविली आहे. ती एका शेतकरी कुटूंबातील विद्यार्थीनी असून वडील हे रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतात तर आई ही गृहीणी आहे.सानिका भोईर हिने जीवनात खुप मोठे ध्येय बाळगले असून आपले ध्येय खुप अभ्यास करून साध्य करणार असल्याचे तिने सांगितले आहे.

कु. सानिका हिच्या या उज्ज्वल यशाबद्दल देवकान्हे ग्रामस्थांसह खांब पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून तिचे अभिनंदन व्यक्त होताना दिसत आहे.

Popular posts from this blog