🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨
माणगांव गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल 100 %

कु. संस्कृती विशाल येलवे प्रथम 


माणगांव (सचिन पवार) :
महाराष्ट्र राज्य माद्यमिक व उच्य माद्यमिक मंडळातर्फे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल बुधवारी दि. 29 जुलै 2020 रोजी ऑनलाईन जाहीर झाला. या दहावी परीक्षेत माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाच्या गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मिडीयम स्कूलचा निकाल 100% लागला असून कु. संस्कृती विशाल येलवे या विद्यार्थीनीने 91.20% गुण संपादन करून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच कु. दिया अशोक महाडिक हिने 89.40% मिळवून द्वितीय क्रमांक काढला तर कु. अभय राजेंद्र जाधव याने 85.40% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे कु. श्रावणी मनोज राजपूरकर 84.20% ही चतुर्थ क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. गणेश वाघरे स्कूल मध्ये दहावी परीक्षेला एकूण 15 मुले बसले होते हे सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने पालक वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. या सर्व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना स्कूलच्या माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाचं अध्यक्ष अॅड. राजीवजी साबळे, स्कूल कमिटी चेअरमन राजन मेथा, कृष्णाभाई गांधी, प्राचार्य मनीषा मोरे व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Popular posts from this blog