संभे माजी सरपंच पांडुरंग महाबळे यांना पित्रुवियोग  


रोहा (समीर बामुगडे) :
रोहे तालुक्यातील संभे ग्रा.पंचायतीचे माजी सरपंच व महाबळे पाले येथील रहिवासी पांडुरंग महाबळे यांचे वडील हरिराम कृष्णा महाबळे यांचे बुधवारी, दि.२७ मे रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.

तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन शिवराम महाबळे यांचे सख्खे चुलत मोठे बंधू तर विद्यमान सरपंच समीर महाबळे यांचे सख्खे चुलते असणारे हरिराम महाबळे हे वारकरी सांप्रदायाचे निस्सीम भक्त होते. त्यांनी आपल्या हयातीत नित्यनेमाने आळंदी व पंढरपूरची वारी करुन सांप्रदायाचे प्रचाराचे कार्यही केले.ते शेकापचे निष्ठावंत कार्यकर्ते तर होतेच त्याशिवाय सामाजिक क्षेत्रातही त्यांचा नेहमीच मोलाचा सहभाग असायचा. तसेच गावातील विविध विकासकामातही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून त्यांच्या अंत्यविधीसाठी आंबेवाडी सरपंच सुरेश महाबळे व महाबळे परिवारातील सदस्य तसेच मोजकेच ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन भाऊ, तीन बहिणी, नातवंडे, पतवंडे असा एकूण १३० माणसांचा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी शुक्रवार, दि.५ मे तर अंतिम धार्मिकविधी रविवार, दि.७ मे रोजी राहत्या निवासस्थानी होणार असून सध्या कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणीही महाबळे परिवाराची सात्वंनपर भेट न घेता फोनवरून सात्वंन करावे असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून माहिती देताना सांगितले.

Popular posts from this blog