कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीसांच्या कुटुंबियांना ६५ ते ७० लाखांची मदत 

मुंबई पोलीस आयुक्तांची घोषणा 


मुंबई : राज्यात पोलीस दलातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा ५०० वर जाऊन पोहोचला आहे. दुसरीकडे ६ पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांसाठी ६५ ते ७० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला शासकीय नोकरी मिळेल, असेही आयुक्तांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या संकटात वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलीस अहोरात्र मेहनत घेत रस्त्यावर उभे आहेत. कोरोनाने पोलीसांनाही विळखा घातला आहे. राज्यात आतापर्यंत मुंबईत ३, पुणे १ आणि सोलापूरमध्ये एक अशा ५ पोलीसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या संसगार्मुळे मृत्यू झाल्यास पोलीसांच्या कुटुंबियांना ६५ ते ७० लाख रुपये आर्थिक मदत दिली जाईल, अशी घोषणा मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केली. त्याचप्रमाणे कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला शासकीय नोकरी मिळेल. कोरोनामुळे दूर राहणा-या पोलिसांना पोलीस स्टेशनमध्ये तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यानुसार सांताक्रुझ वाकोला पोलीस वसाहतीतील एक इमारत कोविड रुग्णालयात रुपांतर केले आहे. या ठिकाणी जवळपास ३०० बेडची व्यवस्था केली गेली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

Popular posts from this blog