मंत्रालयातील प्रधान सचिवांना कोरोनाची लागण 


मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच, आता या विषाणूचा मुंबईतील मंत्रालयातही शिरकाव झाला आहे. एका विभागाच्या प्रधान सचिवांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. संबंधित अधिकाऱ्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर सर्व सहका-यांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील कर्मचा-यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंत्रालयाच्या इमारतीतील कामकाज दोन दिवसांसाठी बंद करण्यात आले होते. तसेच इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. आता मंत्रालयातील एका विभागाच्या प्रधान सचिवांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परराज्यांतील मजूर आणि राज्यात अडकलेल्या नागरिकांच्या व्यवस्थेसाठी मंत्रालयात सचिवांचा विशेष गट स्थापन करण्यात आला होता. त्या गटात या अधिका-याचा समावेश आहे. आता याच अधिका-याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे चाचणी अहवालानंतर स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे खबरदारी म्हणून, त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर सहकाऱ्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. यापूर्वी मंत्रालयातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी मंत्रालय बंद करावे लागले होते. आता या अधिका-याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंत्रालयातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही सहावर पोहोचली आहे

Popular posts from this blog