🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨
कोरोनाचा पार्श्वभूमीवर साईंचा पालखी सोहळा शासकीय नियमांच्या चौकटीत साजरा होणार - संताजी ठाकूर 


रोहा (समीर बामुगडे) :
येत्या २० मे रोजी रोहे तालुक्यातील सानेगाव येथे गेल्या अनेक वर्षांची यशस्वी परंपरा असणारा साईंचा पालखी सालाबादाप्रमाणे याही वर्षी संपन्न होणार असून संपन्न होणारा पालखी सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालखीनुसार संपन्न होणार असल्याची माहिती
गाव कमिटी अध्यक्ष संताजी ठाकूर यांनी दिली आहे.

यंदाही सानेगाव कुणबी समाज साईंचा उत्सव व पालखी सोहळा संपन्न होणार असून पालखीसोबत केवल ४ कार्यकर्ते असणार आहेत. तर पालखीचे कोणालाही घरोघरी दर्शन घेता येणार नाही व कुठेही पालखी थांबणार नाही. दर्शन फक्त देवळातच जमावबंदी आदेशाचे व सामाजिक सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करूनच दिले जाईल. तसेच सानेगाव ग्रामपंचायत व रोहा तहसीलदार कार्यालय यांनी दिलेल्या नियमांचं कोणीही उळघन करणार नाही अशी प्रत्येक समाज कार्यकर्त्याने संपन्न झालेल्या सभेत घेतली आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी साई भंडारा असतो. सर्व माहेरवाशीण, नोकरी निमित्त बाहेर गावी असलेली तरुण मंडळी सर्वजण गावात येऊन उत्सवात सहभागी होतात. परंतु यावर्षी कोणीही बाहेरून येऊ नये अशी सर्वांना कल्पना दिली आहे अशी माहिती कुणबी समाज गाव सचिव देवराम निबरे, अध्यक्ष संताजी ठाकूर रोहा तालुका सचिव सुनील ठाकूर, मेढा ग्रुप अध्यक्ष राम करंजे व गावचे पदाधिकारी यांनी दिली आहे.

सध्या जगभर कोरोना विषाणुनीने थैमान घातल्याने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने उत्सवाला कोणतेही गालबोट न लागता शासकीय नियमांच्या चौकटीत राहूनच सदरचा उत्सव अतिशय साध्या पद्धतीने संपन्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Popular posts from this blog