🚨 पनवेल शहर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी; 5 वर्षांपासून रायगड, पुणे, कोल्हापूर व इतर जिल्ह्यांतून फसवणूक करून फरार असलेला बोगस पत्रकार संजय पांडुरंग कदम याला पनवेल हद्दीतील फसवणुकीच्या गुन्ह्यात शिताफीने अटक... 🚨
सोशल मिडियावर मैत्री करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पेणमध्ये तरूणाला अटक


पेण (प्रतिनिधी) : पेण तालुक्यातील रोडे-काश्मीरे येथील राहणारा आरोपी प्रशांत सदाशिव पाटील याने एका तरुणीला सोशल मिडियावरील इंस्टाग्रामवर अश्लील मेसेज पाठवून तसेच तिच्या बरोबर मैत्री करुन लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पेण पोलीसांनी त्याला अटक केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आरोपी प्रशांत सदाशिव पाटील याने एका तरुणीला सोशल मिडियावरील इंस्टाग्रामवर अश्लील मेसेज पाठवून तिच्या बरोबर मैत्री करून तिचा 11 मार्च 2020 रोजी काॅलेजवरून एकटीच पायी येत असतांना पाठलाग करत तिच्याबरोबर ओळख करून तिच्या अज्ञातपणाचा फायदा घेऊन तिला फिरण्यासाठी घेऊन जाऊन, तसेच तिच्या प्रेम प्रकरणाबाबत आई वडीलांना सांगेन असे धमकावून तिला ब्लॅकमेल करून त्याने तरुणीला हायवेवरील हाॅटेलवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने तसेच तिच्या मनाविरुध्द लैंगिक अत्याचार केल्याची फिर्यादी तरुणीने पेण पोलीस ठाण्यात दाखल केली असता आरोपी प्रशांत सदाशिव पाटील याच्यावर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6,8, व 12 अन्वये 376, 323, 341, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पेण पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एन.पिंपळे करीत आहेत. याप्रकरणी आरोपी प्रशांत सदाशिव पाटील यास आज अलिबाग न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Popular posts from this blog