🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨
रोहा पोलीसांनी वाचवले महिलेचे प्राण 



रायगड (किशोर केणी) :
रोहा पोलीस ठाणे हद्दीतील महिला सौ. कौशल्या गिरीधर कांबळे (वय 55) राहणार - आदर्शनगर भुवनेश्वर, ता. रोहा ही घरातील कौटुंबिक वादाच्या रागातून घरात कोणासही काही एक न सांगता दिनांक 01 / 05 / 2020 रोजी घरातून कुठेतरी निघून गेली होती. त्याबाबत सदर महिलेचा मुलगा कैलास कांबळे याने रोहा पोलीस ठाणे येथे मिसिंग तक्रार दिली होती. या मिसिंगचे तपासिक अमलदार पोलीस हवालदार / 954 महेंद्र खोत हे सदर महिलेचा शोध घेत होते. दिनांक 03 / 05 / 2020 रोजी सकाळी 06 वाजण्याच्या सुमारास राकेश वाघमारे रा. अष्टमी, ता. रोहा यांनी रोहा पोलीस ठाण्यात समक्ष येऊन माहीती कळविली की, रोहा अष्टमी फरशीचा पूल परीसरात कुंडलिका नदी पात्राच्या पाण्यात एक वयोवृद्ध महीला पाण्यात अर्धवट तरंगत्या अवस्थेत दिसून येत असून तिच्या शरीराची काहीएक हालचाल होत नाही. असे कळविल्याने रोहा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस नाईक / 1437 तुषार पारवे, पोलीस नाईक 1560 मनिष ठाकूर व पोलीस नाईक / 1541 सुनिल पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता नदी पात्राच्या पाण्यात एक महिला तरंगत्या अवस्थेत दिसून आल्याने पोलीसांनी त्या महिलेला तातडीने पाण्याबाहेर काढले असता सदर महिला बेशुद्धावस्थेत तथा जिवंत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस नाईक 1541 पाटील यांनी सदर महीलेला CPR द्वारे प्रथमोपचार व कृत्रिम श्वास दिला असता सदर महिला शुद्धीत आल्याने तिला औषधोपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय, रोहा येथे दाखल करण्यात आले. सदर महिलेवर रुग्णालयात औषधोपचार सुरू असून तिची प्रकृती ठीक आहे.

सदर महिलेकडे पोलिसांनी विचारपूस केली असता घरातील कौटुंबिक वादाच्या रागातून ती घरातून निघून गेली होती. दोन दिवस ती रोहा येथील निवी परीसरात पायी चालत फिरून अष्टमी येथील कुंडलिका नदी किनारी एकांतात पाण्याच्या ओहळाला लागून बसलेली असताना शेवाळीच्या खडकावरून तीचा पाय घसरून ती नदीच्या पाण्यात पडली होती अशी हकीगत सदर महिलेने सांगितली.

सदर महिला मिळून आलेल्या घटनास्थळी तसेच रुग्णालय येथे रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. एन. व्ही. बंडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. जाधव यांनी भेट देऊन विचारपूस केली असता महिलेची प्रकृती चांगली असून काही एक तक्रार नाही. सदर महिलेचे प्राण वाचवल्याबद्दल त्यांचा मुलगा कैलास गिरीधर कांबळे याने पोलीसांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.

Popular posts from this blog