क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमीटेड (ग्रामीण कुटा) कंपनीची सामाजिक बांधिलकी
कंपनीतर्फे कोविड-१९ रिलीफ हेल्थ किटचे वाटप
पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) :
क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड (ग्रामीण कुटा) या कंपनीने सामाजिक बांधीलकी जपत दि. २८ मे २०२० रोजी म्हसळा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व म्हसळा पोलीस ठाणे येथे जाऊन तेथील पोलीस कर्मचारी यांना कोविड-१९ रिलीफ हेल्थ किटचे वाटप केले.
यावेळी श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी बी. पी. पवार, म्हसळा पोलीस निरीक्षक डी. सी. पोरे, पोलीस उपनिरीक्षक दिपक धूस, वैद्यकीय अधिकारी डॉ. काटे, किरणकुमार मोरे (सी.ओ.) आदी मान्यवर उपस्थित होते.
त्याचप्रमाणे दि. ३० मे २०२० रोजी रोहा नगरपरिषद, रोहा पोलीस ठाणे, कोलाड पोलीस ठाणे व प्राथमिक आरोग्य येथे कोविड-१९ रिलीफ हेल्थ किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, रोहा पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे, रोहा नगरपरिषद सी.ओ. बाळासाहेब चव्हाण, डॉ. कृष्णा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. कंपनीच्या वतीने एरिया मॅनेजर राम माने, ब्रँच मॅनेजर अमोल ठाकरे, कुंडलिक गायकवाड, सुनील लोणे, केंद्र मॅनेजर योगेश बोधडे यांनी विशेष परिश्रम घेतले.