लोणेरे ग्रामपंचायतीकडून नागरिकांना सॅनिटायझर व गरजूंना अन्नधान्य वाटप
लोणेरे (उदय चव्हाण) :
कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे सध्या देश लाॅकडाऊनच्या छायेखाली असताना शासन व विविध स्वयंसेवी संस्थाकडून नागरिकांच्या आरोग्यासाठी व उदरनिर्वाहासाठी काळजी घेतली जाते. याच धर्तीवर लोणेरे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना सॅनिटायझर आणि अत्यंत हालाकीच्या परिस्थितीला तोंड देणाऱ्या आदिवासी, विधवा, अपंग, तसेच इतरही गरीब व गरजू नागरिकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायतीच्या सर्व सन्माननीय सदस्य, सरपंच आणि कर्मचारी वर्गाने सुमारे ३०० कुटुंबियांना सदर साहित्यांचे वाटप केले. ग्रामपंचायत सदस्य समीर टेंबे यांनी विशेष मेहनत घेत आपल्या वाॅर्ड क्र. ४ मधील आदिवासी व मागासवर्गीय नागरिकांना यापुर्वी तटकरे युवा प्रतिष्ठानकडूनही अन्नधान्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.