कोरोनारूपी संकटाचा सामना करण्यासाठी ग्रामपंचायत वैजाळी-हाशिवरे व ग्रामस्थ मंडळातर्फे विविध उपाययोजना
हाशिवरे (सागर पाटील) :
संपूर्ण देशात कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरिता लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. दरम्यान, ग्रामपंचायत वैजाळी - हाशिवरे हद्दीत विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. २ वेळा जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आली. ग्रामपंचायत हद्दीतील सर्व ग्रामस्थांना ग्रा. पं. मार्फत मास्क / रुमाल यांचे वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ जे मुंबई - पुणे - ठाणे व इतर बाहेर गावातून आलेल्या नागरिकांची दि. २० एप्रिल २०२० रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पेढांबेच्या वैद्यकीय अधिकारी अनुप्रिया खटावकर, आरोग्य सेवक यु. बी. भायदे, मंगला पाटील, आरती ठाकूर व त्यांची पूर्ण आरोग्य टीम यांच्या मार्फत थर्मल मशीनने तपासणी करण्यात आली. तसेच ग्रा. पं. च्या अशासेविका सुवर्णा पाटील, आशा पाटील, सिंधू मिसाळ व अंगणवाडी सेविका सीमा पाटील, पुष्पा पाटील, रुपवंती गावंड यांनी सर्व ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन त्यांची आरोग्य तपासणी केली. ग्रामपंचायत वैजाळी हद्दीतील गरजू लोकांना व मजुरांना ग्रामपंचायत वैजाळी मार्फत धान्य वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायत वैजाळीच्या सरपंच संध्या पाटील, उपसरपंच शशिकांत ठाकूर, सदस्य सागर पाटील, सलील मोकल, अंकुर मोकल, सदस्या अरुणा पाटील, सुप्रिया पाटील, शैला पाटील, सुजाता पाटील, शालिनी मोकल, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर पाटील तसेच ग्रामपंचायत वैजाळी हद्दीत सुरेश गावंड व पंच कमिटी तसेच इतर सर्व ग्रामस्थ मंडळ कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता सहकार्य व प्रबोधन करीत आहेत. ग्रामपंचायत हद्दीत २४ तास कोरोना नियंत्रण कक्ष असून ग्रामपंचायत वैजाळी मार्फत ग्रामसेवक व्ही. के. म्हात्रे, कर्मचारी सचिंद्र ठाकूर, जीवन पाटील, धर्मेद्र म्हात्रे, शिल्पा पाटील, विद्या ठाकूर, दिलीप म्हात्रे, पोलीस पाटील रविंद्र पाटील आदि कर्मचारी उपस्थित असून आलेल्या नागरिकांची माहिती संकलन करणे व कोरोना संदर्भात जनजागृती करण्याचे काम कोरोना नियंत्रण कक्ष करीत आहे.