सुप्रसिद्ध धावीर बेकरीच्या मालकाची वहिवाट बेकायदेशीरपणे रोखली, रोहा तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल
रोहा (समीर बामुगडे) :
रोहा शहरातील सुप्रसिद्ध धावीर बेकरीच्या वरसे मधील मालकीच्या जागेची बेकायदेशीरपणे वहिवाट रोखण्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकारणी रोह्याच्या तहसीलदार कविता जाधव यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
११ जुलै २००२ रोजी सदर जागा धावीर बेकरी मालकाने खरेदी केली होती. खरेदीखत करतानाच या जागेसाठी पाच फुट रस्ता देण्यात आला आहे. तशी खरेदीखतामधे नोंद देखील आहे. याच जागेला लागून दुसरा व्यवहार ५ ऑगस्ट २००२ रोजी झाला तेव्हापासून दहा फूट रस्ता बेकरी कामासाठी वापरला जात आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उद्योगधंदे बंद आहेत. धावीर बेकरीचे काम कायद्याच्या कक्षेत सुरु आहे. या जागेवर दोन्ही वहिवाट एक लोखंडी गेट टाकुन व दुसऱ्या बाजूला कुंपण टाकुन बंद केली आहे. सध्या या बंदिस्त जागेतून बेकरीचे सामान बनवले जात आहे. या कामासाठी असलेल्या कारागीरांची बेकायदेशीररित्या वहिवाट रोखल्याने ते अडकून पडले आहेत. या प्रकारामुळे त्यांची उपासमार होते आहे.
तहसीलदार कविता जाधव यांनी देखील तक्रार पाहताच या प्रकाराबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त केले. खरेदीखतामध्ये वहिवाट नोंद स्पष्ट असताना असे गैरप्रकार कुणी केले ? हा अनाकलनीय प्रश्न सर्वांनाच पडला. या प्रकरणी त्वरित न्याय न मिळाल्यास न्याय हक्कांसाठी वेळ पडल्यास सहकुटूंब उपोषण करु असा इशारा निखिल चंद्रसेरील यांनी दिला आहे.