माणगावमध्ये जयश्री खाणावळ येथे गरिब आणि गरजूंसाठी शिवभोजन थाळी केंद्र सुरू



माणगाव (प्रतिनिधी) :
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य या विभागाद्वारे राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिव भोजन थाळी  योजना ही उपलब्ध करून देण्याची योजना शासनाच्या विचारधीन होती. त्याअनुषंगाने माणगाव तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी मोर्बा रोड उपजिल्हा रुग्णालयासमोर नंदकुमार (नाना) यादव यांच्या जयश्री खाणावळ येथे बुधवार दि.१५ एप्रिल २०२० रोजी शिव भोजन थाळी  केंद्र सुरू करण्यात आले. तसेच याआधी माणगांवमध्ये निजामपूर रोड येथे दि. १ एप्रिल २०२० रोजी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याहस्ते पहिले शिवभोजन केंद्र सुविधा उभारे याचे साई सुविधा भोजन केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र आता अजून एक जयश्री खाणावळ येथे शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले आहे.
यावेळी नगराध्यक्षा योगिता चव्हाण, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, नगरसेवक संदीप खरंगटे, जयंत बोडेरे, नाना यादव, निलेश यादव, नेहा यादव इ. मान्यवर उपस्थित होते.
सदरची शिव -भोजन थाळी ही दहा रुपये थाळी याप्रमाणे देण्यात येणार होते. परंतु देशात महाराष्ट्र पसरलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भाव पाश्र्वभूमीवर गरजू व गरीबांना सदरची थाळी ही पाच रुपये दरामध्ये माणगाव येथे नंदकुमार यादव  यांच्या जयश्री खानावळ मध्ये शिव भोजन केंद्राद्वारे सुरू करण्यात आले आहे. या भोजनालयात या थाळीमध्ये दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक मूद भात व एक वाटी वरण, असा समावेश करण्यात आला आहे. हे भोजन सकाळी ११ वा. ते ३ वा. या वेळेत जयश्री खानावळ येथे पार्सल स्वरूपात देण्यात येणार आहे. माणगाव मधील गरीब व गरजू लोकांची पाच रुपयामध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आल्यामूळे जनतेमधून यावेळी मोठे समाधान व्यक्त होत आहे.

Popular posts from this blog