सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
रोहा (रविना मालुसरे) :
सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या माध्यमांतून रोहा तालुक्यातील चिल्हे आदिवासीवाडी मधील गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या कोलाड येथील काही सदस्यांनी चिल्हे आदिवासीवाडीतील आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंची गरज असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. तद्नंतर सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या सदस्यांनी चिल्हे आदिवासीवाडी मध्ये जाऊन गरीब कुटुंबांना महिनाभर पुरेल अशा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये अन्नधान्ये, साबण, मसाले इत्यादी साहित्यांचा समावेश आहे. प्रत्यक्ष लाभार्थींच्या घरी जाऊन साहित्याचे वाटप करण्यात आले. यादरम्यान, सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्यात आले. तसेच सॕनीटायझरचाही वापर करण्यात आला. साहित्य वाटपासाठी सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे किरण कानडे, मयुर धनावडे, अनय बारस्कर, विनित वाकडे, सुरज उंद्रे, रोहन दांडेकर, सौरभ भगत, योगेश सोनवणे, परेश चितळकर, प्रसाद पवार इत्यादी सदस्य उपस्थित होते.
सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असणाऱ्या सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानने राबविलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.