ग्रुप ग्रामपंचायत शिरवलीतर्फे परिसरातील १२० गरजू कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
खालापूर (प्रतिभा शेवाळे) :
जगभरासह भारतामध्ये कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढताना दिसतोय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने १४ एप्रिल २०२० रात्री १२.०० पर्यंत भारतभर लॉकडाऊन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रुप ग्रामपंचायत शिरवलीच्या वतीने ग्रा.पं परिसरातील गरजू अशा १२० कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये तांदूळ, पीठ, डाळ, कडधान्य, तेल, लहान मुलांसाठी बिस्किटे, मीठ, तिखट मसाला अशा रोजच्या वापरातील किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थितांनी ग्रामस्थांना घरीच राहण्याचे आवाहन केले. कोरोना विषाणू पादुर्भाव रोखण्यासाठी शासन पातळीवर दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास सांगितले. जसे सोशल डीस्टन्स ठेवणे, नियमित हाताला सेनीट्रायजर लावणे, साबणाने नियमित हात स्वच्छ धुणे. गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. वेळी शिरवली ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच श्री. शैलेश शंकर मोरे, उपसरपंच श्री. सदानंद महादेव मोरे, सामाजिक कार्यकर्ते श्री. एच. आर. पाटील. ग्रा.पं सदस्य श्री. भागू बाळू बोडेकर, श्री. भास्कर सखाराम जाधव , सौ. सुवर्णा आनंद पाटील, सौ.स्वरा दिपेश मोरे, सौ. मोनिका दीपक मोरे, सौ. भुरी संतोष वाघमारे, तसेच पोलीस पाटील सौ. गीतांजली रामचंद्र ढमाळ, ग्रा.पं कर्मचारी श्री. गणेश शंकर जाधव श्री. यशवंत धुमाळ कु. उमेश दामोदर दळवी, सामाजिक कार्यकर्ते श्री.अनिल पाटील, श्री. मंगेश मोरे, श्री. जगदीश पाटील, श्री.दिपेश मोरे, श्री. स्वप्नील मोरे, श्री. भगवान ढेबे आणि ग्राम सेवक प्रल्हाद पाटील उपस्थित होते.