कोरोना संकटात रुग्ण सेवा करीत लढतायत माझ्या तीन लहान बहिणी यांचा मला सार्थ अभिमान आहे

खऱ्या अर्थाने कोव्हिड योद्धा नव्हे, देवदूतच आहेत त्या.! सलाम यांच्या कार्याला

आजचा हा लेख समस्त कोरोना फायटर्सच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी... नक्की वाचा...


माणगांव (रविंद्र कुवेसकर) :
सध्या आपण कोरोना (कोव्हिड-19) या वैश्विक महामारीच्या संकटाने हैराण आहोत. या संकटात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या जनसेवकांच्या पंक्तित माझ्या कुटुंबातील माझी पाच भावंडही मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात या लढ्यातील सैनिकांची भुमिका पार पाडताहेत. माझी एक बहिण विनिता विश्वास झगडे जी. टी. हाॅस्पीटल मुंबई येथे स्टाफ नर्स म्हणून सेवेत रूजू आहे. आठ दिवस ड्युटी करुन आठ दिवस घरी होम क्वाॅरंटाईन राहायचे. घरी येताच संपूर्ण काळजी घेत सॅनिटाईज होऊन घरातील कुटूंबियांची सेवा करायची आणि पुन्हा आठ दिवस सेवेत रूजू व्हायचे, असा तिचा दिनक्रम असून माझी दुसरी लहान बहिण अंजली संजय लांजेकर  राजावाडी हॉस्पिटल (म.न.पा.) घाटकोपर येथे रुग्ण सेवेत कार्यरत आहे.

आठ तास ड्युटी करुन रुग्णालयाने सोय केलेल्या हाॅटेलमध्येच राहून पुन्हा दुसऱ्या दिवशी सेवा करायची. आपली दोन लहान मुलं घरी ठेवून स्वतःच्या कुटूंबापासून दूर काम करताना किती दडपण असेल माझ्या या बहिणींच्या मनावर, याची कल्पना करुन मन सुंन्न होत आहे. खरच कौतुक आहे माझ्या या लहान बहिणींच.! सिस्टर तुम्हांला त्रिवार सलाम ! आणखी तिसरी छोटी बहीण रश्मी राजेश झाडगांवकर, सिव्हील हाॅस्पीटल रत्नागिरी मध्ये कार्यरत असून तिथे आलेल्या एका सर्वसाधारण रुग्णांची सेवा करताना, तो रूग्ण कोरोना बाधीत असल्याचे नंतर लक्षात आल्याने माझ्या या बहिणीला आणि तिच्या सोबत ड्युटीवर असलेल्या सर्वांना आपल्या कर्तव्यावर असताना रूग्णाच्या संपर्कात आल्याने क्वाॅरंटाईन च्या अग्नीदिव्यातून जावे लागले आहे.

सुदैवाने त्यांची स्वॅब टेस्ट निगेटीव्ह आली आहे. तिने संपूर्ण खबरदारी घेतल्याने आठ दिवसांनी पुन्हा ती रुग्णसेवेत दाखल होऊन धाडसाने कार्यरत आहे. तिलाही दोन लहान मुलं आहेत. माझ्या या तीन सख्या चुलत बहीणी कोरोना संकटात कोव्हीड योध्दा म्हणून लढतायत. त्यांचा आम्हां समस्त कुवेसकर कुटुंबियांना सार्थ अभिमान आहे. तसेच माझे दोन चुलत भाऊ पोलीस खात्यात एक रत्नागिरी जिल्ह्यात उपनिरिक्षक शरद कुवेसकर तर दूसरा रायगड जिल्ह्यात चालक पोलीस हवालदार किशोर कुवेसकर हे दोघेही कोरोना संकटात सेवा देत आहेत. माझी आत्या रेखा बाकाळकर ही जी. टी. हाॅस्पीटल मुंबई मध्ये मेट्रन स्टाफ नर्स होती. पण सध्या सेवा निवृत्त आहे. माझे वडिल सबइन्स्पेक्टर मुकुंद कुवेसकर तर चुलते हवालदार महादेव कुवेसकर हे दोघेही पोलीस खात्यात होते. दोघेही आज हयात नाहीत. त्यांचेही आशिर्वाद माझ्या या भावंडांस नक्कीच मिळत असतील.
माझ्या या कुटुंबियांचे मला आज कोरोना पार्श्वभूमीच्या निमीत्ताने खुपच कौतुक वाटत आहे. खरं तर माझी ही भावंड आपआपल्या घरी सुखरुप आहेत. आम्ही सर्वजण दूरवर राहिल्याने एकमेकांना भेटण्याचा योग येत नाही. म्हणूनच माझी त्या अज्ञात शक्ती, ईश्वरापाशी विनम्र प्रार्थना आहे... "देवा या सर्वांना, या महाभयंकर कोरोना संकटाशी लढण्याची शक्ती दे." आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात, देशात असच काम करणाऱ्या आपल्या या सर्व पोलिस बांधवांना आणि आरोग्य सेविकांना माझा त्रिवार सलाम ! कोरोना संकटात आपण सर्वांनी या माणसांतील देवदूतांचे आपल्यावर असलेले हे प्रचंड ॠण आपण शब्दांत व्यक्तच करु शकत नाही. आज खरंच देवालये बंद आहेत, देव नाही देव्हाऱ्यात, देव नाही देवालयी ! अस म्हणताना साक्षात हीच आपल्या आजुबाजूला जनसेवा करणारी माणसच देव आहेत. याचा साक्षात्कार माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला होत आहे. म्हणूनच म्यां पामराचा साक्षात दंडवत या देवदूतांपाशी...

देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी
देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी
देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई?
देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी

देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे
देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी
देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी
देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी

देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना गावे
देव आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे
तुझ्या माझ्या जड देही देव भरुनिया राही
देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी

देव स्वये…

Popular posts from this blog