डॉ. मुनीर तांबोळी यांची केंद्रीय पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावर निवड


बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : केंद्रीय पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावर डॉ. मुनीर तांबोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी नियुक्ती पत्र देऊन केली आहे.गुणवत्ता व कार्यक्षमता पाहून डॉ. मुनीर तांबोळी यांची नियुक्ती संदीप कसालकर यांनी केली असून कायदे व नियमांचे सदैव पालन करून संघटनेच्या उद्देशानुसार पत्रकार जगताच्या हितासाठी सदैव कार्यरत राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ. मुनीर तांबोळी यांनी आत्ता पर्यंत अनेक सामाजिक विषय सोडवलेत,मानवी हक्कासाठी त्यांनी लढा दिलेला आहे.अनेक साप्ताहिक वृत्तपत्रात पत्रकार, उपसंपादक, कार्यकारी संपादक म्हणून काम केले आहे. सध्या मराठी दैनिक भारत की आवाज वृत्तपत्रामध्ये कार्यकारी संपादक आहेत.केंद्रीय पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी काम करणार असल्याचे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले. त्यांच्या निवडी बाबत अनेक सामाजिक संघटना व नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Popular posts from this blog