उतेखोल येथे गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 


माणगांव (अनिल मोकाशी) :
देशातील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करोना मुक्तीसाठी शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन संचारबंदी काळात ग्रामीण भागातील गोर गरीब जनतेचे कोणत्याही प्रकारचे  हाल होऊ नये म्हणून शासनाच्या माध्यमातून सर्व प्रकाराच्या सुविधा उपलब्ध करण्यसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.


या प्रयत्नांना जोड म्हणून अनेक दानशूर व्यक्ती, सामजिक संस्था व शासकीय यंत्रणा मदत करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून माणगांव शहरातील अमित कॉम्प्लेक्स सी टू ए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित उतेखोल या रहिवासी संघटनेतर्फे गरजवंत नागरिकांना एक किलो गोडेतेल, पाच किलो तांदूळ, दोन किलो कांदे, दोन किलो बटाटे, एक किलो मूग डाळ व एक किलो मीठ असे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.


अमित कॉम्प्लेक्स सी२ए सहकारी गृहनिर्माण संस्था उतेखोल चे अध्यक्ष राजेश कदम, सेक्रेटरी आशुतोष कानाडे, खजिनदार संदेश अम्बूर्ले, सचिन मोरे, मांगीलाल बिशनोई, शिवदास मोरे, सचिन मिसाळ, महेश थोरात, मारुती चाटे, दिलीप मोदगी, प्रशांत करंजकर, दिनेश कपनकर, सोमेश्वर टेंबे, अजित कावले यांच्यासह सर्व सदस्यांनी या समाजोपयोगी उपक्रमासाठी पुढाकार घेतला.

Popular posts from this blog