रोहा शहरात ग्राहकांची लुटमार करणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलीसांचा दणका.!
रोहा (समीर बामुगडे) : ग्राहक म्हणजे बाजारपेठचा राजा आजच्या जागतिकीकरण स्पर्धात्मक युगात हा ग्राहक राजा अतिशय महत्वाचा भाग झाला आहे. ग्राहक हा बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल आणि खरेदी विक्रीचा केंद्रबिदू आहे, पण अनेकदा एक वस्तू खरेदी करा आणि दुसरी मोफत मिळवा, अमुक खरेदीवर सोने चांदीचे नाणे मोफत मिळेल, चेहरा ओळखा आणि लाखाची बक्षिसे जिंका अशा जाहिराती दाखवून ग्राहकांची फसवणूक व लुटमार केली जाते. त्यामुळे ग्राहकांनो... वस्तू खरेदी करताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता ही तिच वस्तू असल्याचे नीट पारखुन घ्या. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ नुसार ग्राहकाना वस्तू निवडणे व त्याची गुणवत्ता आणि दर्जा याचे प्रमाण जाणून घेण्याचा अधिकार आहे आणि ग्राहकांची फसवणूक रोखणयासाठी जिल्हा ग्राहक मंच, ग्राहक न्यायालय आणि जिल्हा तक्रार निवारण ही प्रणाली राज्य आणि राष्टीय पातळीवर कार्यरत आहे. रोहा शहरात किरकोळ किरणावाले नागरिकांची कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लुटमार करत आहेत. अशाच प्रकारे दोन दिवसांपूर्वी रोहा एसटी स्टँड जवळील एका तंबाखू विक्रेत्यावर रोहा पोलीसांनी कारवाई केली होती. नागरिकांची लुटमार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर चांगलाच चाप बसला आहे. रोहा शहरात घरगुती लागणाऱ्या वस्तूंच्या किमती चढ्या भावाने अनेक ठिकाणी विक्री सुरू होती. रोहा पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी या विक्रेतेना चाप लावला असून रोहा शहरातील नागरिकांनी पोलीस विभागाचे कौतुक केले आहे.