वनवासी कल्याण आश्रम संस्था रायगड यांच्या वतीने आदिवासी कुटूंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पत्रकार भिवा पवार यांचा पुढाकार
माणगांव (प्रतिनिधी) :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात संचारबंदी व लॉकडाऊन अधिक वाढल्याने हात मजूरांवर दिवसेंदिवस अधिक मोठी संक्रात निर्माण होत असल्याने रायगड जिल्ह्यातील 'वनवासी कल्याण आश्रम' या संस्थेच्या वतीने रोहा, माणगाव, सुधागड, म्हसळा, तळा या तालुक्यांतील ६० आदिवासी वाड्यांवर ६०० कुटूंब व सुमारे ३५०० लाभार्थी यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सोशल डीस्टंन्सचा वापर करत केले आहे.
वनवासी कल्याण आश्रम रायगड चे कार्यकर्ते पत्रकार भिवा पवार यांच्या संकल्पनेने आजपर्यंत शासनाच्या वतीने व काही संस्थांच्या वतीने धान्य म्हणून तांदळाचे वाटप केले आहे. परंतु या संस्थेने कुटूंबाची खरी गरज म्हणून कडधान्य, मुगडाळ, तूरडाळ, कांदे, बटाटे, लसूण, गोडेतेल, मीठ व विविध मसाले, साबण, दोन मास्क यांचे एकत्रित पाऊच करून ग्रामीण भागातील आदिवासी वड्या-पाड्यांवर जाऊन प्रत्येक कुटूंबाला वाटप करण्यात येत आहे.
रोहा तालुक्यातील कोलाड विभागातील आदिवासी वाड्यांवर १९ एप्रिल रोजी या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी रा.जि.प. सदस्य दयाराम पवार, संस्थेचे जिल्हा संघटक विलास ठाकरे, कोलाड पोलीस कर्मचारी शीतल महाडिक, एस. एस. चोगले, डॉ. एम. एस. पालक, संस्थेचे पदाधिकारी के. पी. पवार, चंद्रकांत पवार, विशाल पवार, संतोष वाघमारे, पत्रकार संतोष निकम, डॉ. श्याम लोखंडे आदींच्या उपस्थित या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले असून अधिक एक हजार कुटूंबियांना देण्याचा मानस असल्याचे भिवा पवार यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात संचारबंदी व लॉकडाऊन अधिक वाढल्याने हात मजूरांवर दिवसेंदिवस अधिक मोठी संक्रात निर्माण होत असल्याने रायगड जिल्ह्यातील वनवासी कल्याण आश्रम या संस्थेच्या वतीने रोहा, माणगाव, सुधागड या तालुक्यातील ६० आदिवासी वाड्यांवर ६०० कुटूंब व जवळपास ३५०० लाभार्थी यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सोशल डीस्टंनचा वापर करत केले आहे.
जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आहे असून अधिक एक हजार कुटूंबियांना देण्याचा मानस असल्याचे भिवा पवार यांनी सांगितले. पत्रकार भिवा पवार हे उच्च शिक्षित आदिवासी समाजातील तरुण नेतृत्व असून निर्भीड पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. आदिवासी समाजात आशेचा किरण म्हणून जिल्ह्यात त्यांच्याकडे पहिले जाते. आदिवासी बांधवांची उपसमारी होऊ नये म्हणून 'वनवासी कल्याण आश्रम रायगड' या संस्थेच्या वतीने ते आदिवासी वाड्यांवर जीवनावश्यक वस्तू वाटप करीत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे व वनवासी कल्याण आश्रम या संस्थेचे जिल्ह्यातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मात्र निवडणुकीच्या वेळी आदिवासी वाड्यांवर जाऊन मतांची भीक मागणारे जिल्ह्यातील खासदार, पुढारी आहेत कुठे? असा प्रश्न आदिवासी बांधवाना पडला असून राजकीय नेत्यांच्या या नाकर्तेपणामुळे आदिवासी समाजात संताप व्यक्त होत आहे.