पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व प्रवेशद्वारांवर निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्याची पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची मागणी
पनवेल, दि.१८ (वार्ताहर) : पनवेल महानगरपालिका हद्दीतील शहरात प्रवेश कऱण्यासाठी वेगवेगळे प्रवेशद्वार असून पनवेल शहरापूर्ती तरी या प्रवेशद्वारांवर निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्याची मागणी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे खजिनदार केवल महाडिक यांनी केली आहे.
पनवेल तालुक्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये अशा प्रकारची व्यवस्था प्रवेशद्वाराजवळ करण्यात आली आहे. करंजाडे ग्रामपंचायतीतसुद्धा वसाहतीत प्रवेश करताना निर्जंतुकीकरण कक्ष उभारला आहे. अशाचप्रकारे पनवेल महानगरपालिका हद्दीतसुद्धा निर्जंतुकीकरण कक्ष उभारणे गरजेचे आहे. परंतु अशा प्रकारचे कक्ष कुठेही दिसून येत नसल्याने पनवेल शहरापूर्ती तरी या प्रवेशद्वारांवर अशा प्रकारचे निर्जंतुकीकरण कक्ष उभारावेत अशी मागणी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे खजिनदार केवल महाडिक यांनी केली आहे.