पहाटेच्या वेळी अवकाळी पावसाची दीडतास वृष्टी, जमिन ओलीचिंब, आर्दता वाढली
माणगांव, दि. १९ एप्रिल (उत्तम तांबे) :
आज रविवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास अवकाळी पावसाने पुन्हा एकदा मेघगर्जनेसह जोरदार हजेरी लावली होती. जवळपास दीड-पावणेदोन तास संततधार पाऊस पडल्याने परिसरातील संपूर्ण जमिन ओलीचिंब झाली आणि पहाटेच्या वेळी हवेत गारवा जाणवला. आज सकाळी मात्र वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने उष्णता वाढली आहे. उतेखोल माणगांव येथील तापमान उच्चतम ४२॰ तर न्युनतम २७॰ सेल्सियस तसेच पर्जन्य ४० टक्के वर्तविण्यात आले होते. अगोदरच कोरोना संकटाचे सावट सर्वत्र पसरले आहे. एकंदरीत विचीत्र हवामानाचा फटका पुन्हा एकदा बसल्याने नागरिक हैराण आहेत. आठ दिवसांपूर्वीच ११ एप्रिल रोजी सायंकाळी अवकाळी पाऊस पडला होता.
यामुळे तालुक्यातील फळबागा, बागायती पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा हापूसचा आंबा गावाकडे अजूनही बाजारात आलेला नाही. कोरोना संकटामुळे सगळेच हवालदील झालेले आहेत. अशातच पाऊस पडला तर म्हणतात काही लोक आंबा खात नाहीत. बळीराजाचे अतोनात नुकसान झालेले असून शासनाला आता याकडे लक्ष वेधावे लागणार आहे. दुष्काळात तेरावा अशी जनमाणसाची बिकट अवस्था झाली आहे. या अवकाळी पावसाने दिवसभर उष्णता प्रचंड वाढली असून अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. हे सगळे माणसाने पर्यावरणाच्या केलेल्या ऱ्हासाचे विपरित परिणाम असल्याचेही नागरिकांमधुन बोलले जात आहे.