ते दोन 'जनतेचे रक्षक' देत आहेत विळे ग्रामस्थांना कोरोना संसर्गापासून दक्षतेचा इशारा



माणगांव (प्रतिनिधी) :
संपूर्ण जगासह आज पाहता भारत देशात परीणामी महाराष्ट्रात कोरोना संसर्गित रुग्णांचा आलेख चढत्या क्रमाने वाढताना दिसत आहे. शासन व प्रशासन सर्व स्तरांवर उपाययोजना अवलंबत आहे. तसेच ग्रामीण विभागात देखील सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. पोलीस प्रशासन देखील आपली महत्वाची जबाबदारी पार पाडत आहे.

विऴे विभाग ग्रुप ग्रामपंचायत विऴे हा भाग ताम्हिणी घाट म्हणजेच पुणे जिल्हा व रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुका लागुनच आहे. त्यामुऴे येथील ग्रामीण प्रशासनाने महत्वाची दक्षतेची पावले उचलली आहे. यामध्ये माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस भारत तांदऴे व पोलीस अनिल वडते हे जनतेच्या रक्षणार्थ संपूर्ण पंचक्रोशीतील सर्व गांवाना दक्षतेची जाणीव करुन देत आहेत. अशी स्तुतिसुमने विऴे ग्रामपंचायतीचे सरपंच गजानन मोहीते यांनी रात्री अपरात्री मेहनत घेऊन पंचक्रोशीतील सर्व गावांवर लक्ष ठेवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर उधळली आहेत.

विऴे सरपंच मोहीते  यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना ह्या दोन पोलीस कर्मचार्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

Popular posts from this blog