महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना सहा महिन्यांची वाढ द्यावी
सरपंच सेवा संघाची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करता यावा यासाठी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना सहा महिन्यांची वाढ करावी अशी मागणी सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी मंडळाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे केली आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून देशभरात १४ एप्रिल पर्यंत सर्व लाॅकडाऊन आहे लाॅकडाऊनच्या काळात कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी ग्रामीण भागात सरपंच, उपसरपंच ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य विभागाची सर्व यंत्रणा, अंगणवाडी कर्मचारी विविध उपाययोजना प्रभावीपणे राबवीत आहेत.
राज्य निवडणूक आयोग यांचे २४ फेब्रुवारीच्या पत्रात महाराष्ट्र राज्यातील २५७० ग्रामपंचायतीचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. जून २०२० ला समाप्त होत आहे. ग्रामपंचायतीचे अधिकार व कतर्व्य पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३५ नुसार कार्यवाही करून उचित अधिकारी म्हणून नेमणूक करून तात्काळ कार्यवाही करावी असे म्हटले आहे. या अनुषंगाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींक्षया गंभीर परिस्थिती मध्ये अत्यंत मोलाचे योगदान करीत आहे.
कोरोनाची भीती नागरिकांमधून जावी यासाठी पुढेही सतत उपाययोजना करत राहतील. अडचणीच्या काळात सरपंचांचे योगदान गावांसाठी मोठे आहे हे नाकारून चालणार नाही. या आधी अनेक वेळा वेगवेगळ्या अडचणीच्या काळात अनेक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तरी सर्व मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना सहा महिन्यांची मुदत वाढवून देण्याची मागणी सरपंच सेवा संघाच्या वतीने ई-मेल द्वारा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री व निवडणूक आयोगाकडे केली आहे.
या निवेदनात प्रमुख सरपंच भाऊ मरगळे, विक्रम भोर, बाबासाहेब पावसे, अमोल शेवाळे, रविंद्र पवार, लक्ष्मणराव सरवदे, किरण आंत्रे, आबासाहेब गवारे बाळासाहेब मालुजकर, प्रदीप हासे, संजय वाघमारे, रविंद्र पावसे, पंकज चव्हाण, सौ. भाग्यश्री नरवडे, नवनाथ शिंदे, रविराज गाटे, गणेश तायडे, शंकरराव खेमनर, भाऊसाहेब गुंजाळ, विजय भूषण मोरे, शंकर पोवार, समाधान उदरभरे, भूषण सावंत, जानू गायकर, जयकुमार माने या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.