कर्जत येथील दरोड्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने २४ तासांत तपास लावून ८ आरोपींना ठोकल्या बेडया
रायगड (किशोर केणी) :-
कर्जत तालुक्यातील तिवरे गावच्या हद्दीत सालबो पोल्ट्रीफार्म, नाजव्हिला बंगला येथे दरोड्याचा गुन्हा घडला असून सदर दरोडयाचा गुन्हा हा फार्म हाउसवर घडला गेला असल्याने कर्जत परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते व आरोपींनी गुन्ह्याचे घटनास्थळावरुन सीसीटीव्ही फुटेजच्या वापरी कापन व डीव्हीआर घेवून गेल्याने आरोपीतांनी कोणताही पुरावा मागे ठेवला नसल्याने आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलीसांपुढे होते. त्यामुळे सदर गुन्हयाचा समांतर तपास करुन गुन्हा लवकरात-लवकर उघडकीस आणणेबाबत श्री. अनिल पारस्कर, पोलीस अधीक्षक, रायगड यांनी श्री. जे.ए.शेख, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड यांना आदेशित केले होते.
त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. जे.ए.शेख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अधिकारी-अंमलदार यांना सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीतांबाबत माहिती घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पो.शि./११४४ संदिप चव्हाण यांना सदर गुन्हयातील आरोपीतांबाबत महत्वाची माहिती प्राप्त झाली. याबाबत त्यांनी पोलीस निरीक्षक श्री. जे.ए.शेख यांच्याशी चर्चा करुन पुढील मार्गदर्शन प्राप्त करून घेतले. त्यांनी सदर माहितीशी संबंधीत तांत्रिक बाबींची सत्यता पडताळून स.पो.उ.नि. श्री. चंद्रकांत पाटील, पो.ह. २१०१ सुभाष पाटील, पो.ह. २१०० महेश पाटील, पो.ह. २१३१ दिनेश पिंपळे, पो.ह. २१३० सागर शेवते, पो.शि. ११४४ संदिप चव्हाण, पो. शि. ८०१ आवळे, पो. शि. २३२९ अनिल मोरे असे विशेष पथक नियुक्त करुन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना देवून आवश्यक ते मार्गदर्शन केले..
त्याप्रमाणे नमुद पथकाने (१) अरुण मारुती वाघचौरे, वय-३९ वर्षे, रा.संजयनगर वाडी, वदप गौरकामत, ता.कर्जत, (२) राम हरी पवार, वय-३२ वर्षे, रा. गौरकामत, ता.कर्जत, (३) पो.साळोख, ता.कर्जत, जि.रायगड (४) नरेश इका वाघमारे, वय-३२ वर्षे, रा.डोणवाडी, पो.साळोख, ता.कर्जत, जि.रायगड (५) विलास पुरुषोत्तम वाघमारे, वय-३४ वर्षे, रा.गोरकामत, ता.कर्जत, जि.रायगड (६) सिताराम मारुती पवार, वय-३४ वर्षे, रा.मोरेवाडी, खालापूर, ता.खालापूर सध्या रा. गौरकामत, ता.कर्जत, जि.रायगड (७) अमर पुरुषोत्तम जाधव, वय-३७ वर्षे, रातांबस, ता.कर्जत, जि.रायगड (८) विजय बाळू कोलंब, वय-५० वर्षे, रा.चांदई, पो. नसरापूर, ता.कर्जत यांना शिताफीने कर्जत व लगतच्या परिसरातून ताब्यात घेतले. त्यामध्ये नमुद इसमांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल करुन घडलेला सर्व घटनाक्रम कथन केला. नमुद आरोपींपैकी आरोपीत क्र.१ व २ हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुध्द यापुर्वी अनुक्रमे (१) खालापूर गु.रजि.नं.१४३/२००६, भा.दं.वि.क.३९५, (२) खालापूर गु.रजि.नं ११५/२०१८ भा.दं.वि.क. ३९९, (३) कर्जत कॉ.गु.रजि.नं. १०५/२००६, भा.दं.वि.क.३९४,३३, (४) खालापूर गु.रजि.नं.९०/२००७ भा.दं.वि.क.३९४,३४, (५) खालापूर गु.रजि.नं. १८३/२००६ भा.दं.वि.क.३९५, (६) वडगांव-माळव, जि.पुणे ग्रामिण गु.रजि.नं.७७/२००५ भा.दं.वि.क.३९९ आणि (१) खालापूर गु. रजि.नं.१३५/२००७ भा.दं.वि.क.३९५, (२) खालापूर गु.रजि.नं.९०/२००७ भा.दं.वि.क.३९४,३४, (३) नेरळ गु.रजि.नं.११०/२००७ भा.दं.वि.क.३९४,३४, (४ )खालापूर गु.रजि.नं २५/२००७ भा.दं.वि.क. ३९४,५०४,५०६,३४, (५) खालापूर गु.रजि.नं.143/2006 भा.द.वि.क.395 (6) खोपोली गु.रजि.नं.१४०/२००६ भा.दं.वि.क.३९२,३४७, कर्जत गु.रजि.नं.१०५/२००६ भा.दं.वि.क. ३९४,३४ इत्यादी गुन्हे दाखल आहेत.
सध्या वरील सर्व आरोपींना कर्जत पोलीस ठाणे गु.रजि.नं.४४/२०२०, भा.दं.वि.क. ३९५,३९८ या गुन्हयात
अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांची दिनांक ११ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. सदर
गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. ए.आर.भोर, कर्जत पोलीस ठाणे हे करीत आहेत.
पोलीस अधीक्षक श्री. अनिल पारस्कर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनानुसार व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन गुंजाळ
यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. जे.ए.शेख व त्यांच्या विशेष पथकाने कौशल्यपुर्ण तपास करुन "दरोडा" सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केवळ २४ तासांच्या आत उघडकीस आणून गुन्हयांतील सर्व आरोपीत यांना अटक केलेली आहे.