रायगड जिल्ह्यात जनता कर्फ्युला उत्स्फुर्त प्रतिसाद
माणगांव (प्रतिनिधी) :
कोरोना व्हायरसच्या वाढता संसर्गाला आऴा घालण्यासाठी पंतप्रधानांनी देशाला केलेल्या अवाहनाला संपुर्ण देशभरात राज्यात आणि रायगड जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद लाभत आहे जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांचे नियोजनबद्ध कामकाज यांमुऴे सर्व शक्य झाले आहे.
रोहा मध्ये सार्वजनिक, लोक वर्दऴीची ठिकाणे, बसस्थानक, रेल्वेस्थानक या ठिकाणी शुकशुकाट जाणवत होता.
कोकण रेल्वे सेवा बंद आहे. सावंतवाडीवरुन दिवा येथे जाणारी गाडी बंद ठेवण्यात आली असून लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या मांडवी एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेस बंद करण्यात आली आहे. माणगांव बसस्थानक, रोहा बसस्थानक येथील सर्व बसेस फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. सर्व रस्ते व ऱाष्ट्रीय महामार्गावर शुकशुकाट जाणवत होता. माणगांव तालुक्याशेजारील ग्रामीण भागात जनता कर्फ्युला उत्तम प्रतिसाद मिऴाला.
एकंदरीत सर्वच ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या नियोजनबद्ध कामकाजामुऴे व जनतेच्या सहभागामुऴे जनता कर्फ्यु य़शस्वी होताना दिसला. माननीय पंतप्रधानांच्या अवाहनानुसार सर्व अत्यावश्यक सेवकांचे स्वागत करत नागरिकांनी शंखनाद, घंटानाद व टाऴ्या वाजवुन कृतज्ञता व्यक्त केली. सर्व प्रशासन, पोलीस प्रशासन आणि ऩागरिकांच्या सहकार्याने जनता कर्फ्यु यशस्वी झाला.