माणगांवमध्ये विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल   


माणगांव (उत्तम तांबे) : 
माणगांव तालुक्यातील एका गावातील पीडीत विवाहीत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीवर माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटना २८ फेब्रु. २० रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, या घटनेतील फिर्यादी महिला व आरोपी सहदेव दामोदर पालकर (रा. रातवड, ता. माणगाव) हे नातेवाईक असून आरोपी सहदेव पालकर याने घरात कोणी नसताना फिर्यादी महिलेचा हात धरून तीला नजरेने खुणऊन सदर महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर सदर घडलेला प्रकार पीडीत महिलेने आपले पती घरी आल्यावर त्यांना सांगितला. त्यानंतर या महिलेने माणगांव पोलीस ठाणे येथे येऊन बुधवार दि. ४ मार्च रोजी तक्रार दिली. त्यानुसार आरोपी सहदेव पालकर याच्याविरुद्ध माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४८/२०२०, भा.दं.वि. कलम ३५४, ४५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बुरुंगले या पुढील तपास करीत आहेत .

Popular posts from this blog