गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर 'दैनिक शिवतेज'च्या रोहा कार्यालयाचा उद्घाटन सोहळा 



रायगड (किरण बाथम) : 
'दै. शिवतेज'च्या रोहा कार्यालयाचा उद्घाटन सोहळा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दि. २५ मार्च  २०२० रोजी सायंकाळी ५:३० वाजता मा. खासदार सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते होणार आहे.

१९८० पासूनच्या रायगड जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रातील अॅड. विजयसिंह जाधवराव यांचे 'दै. शिवतेज' एक अग्रगण्य दैनिक होते. कालौघात बंद झालेल्या या दैनिकाने आता फिनिक्स पक्षासारखी भरारी घेतली आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी सह रायगड जिल्ह्याच्या खारघर पासून पोलादपूर पर्यंत सर्व तालुके, शहर, तसेच गावागावांत हे वृत्तपत्र उपलब्ध आहे.

आपण सर्वांनी गुढीपाडवा या शुभदिनी 'दै. शिवतेज' रोहा कार्यालय उद्घाटन प्रसंगी रोहा फिरोज टॉकीज समोर गुढीपाडवा या शुभदिवशी सायंकाळी ५:३० वाजता  उपस्थित राहावे असे आवाहन किरण बाथम (रोहा कार्यालय प्रमुख, मार्केटिंग मॅनेजर) विजय देसाई, हरिश्चंद्र महाडिक, राजेश हजारे, समीर बामुगडे, महेंद्र मोरे, श्याम लोखंडे, सागर जैन, नरेश कुशवाह, अमलकांत मोरे यांनी केले आहे. 

Comments

Popular posts from this blog