पन्हळघर बुद्रूक ग्रामपंचायत तर्फे राष्ट्रीय पोषण आहार अभियान
माणगांव (प्रतिनिधी) :
माणगांव तालुक्यातील लोणेरे विभागातील पन्हळघर बुद्रूक ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग, एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पाअंतर्गत "सही पोषण देश रोशन /हर घर पोषण उत्सव" या ब्रीदवाक्याला अनुसरून ग्रामपंचायत सरपंच सौ. अपेक्षा अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी पन्हळघर बुद्रुक व आदिवासीवाडी, मिनी अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय पोषण आहार अभियान राबविण्यात आले.
यावेळी उपस्थित उपसरपंच राम सिताराम भोस्तेकर, ग्रामसेवक आदेश तेटगुरे, विजय सखाराम जाधव, मुख्याध्यापक नारायण ढेपे सर, अंगणवाडी सेविका यमुना पाटोळे, कविता कल्पेश नवाले, अंगणवाडी सेविका मोरे ताई, आशासेविका कविता जाधव, विद्यार्थी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.