शिवराज्य प्रतिष्ठान वसई-पालघर तर्फे शिवराज्य चषक २०२० भव्य क्रिकेट स्पर्धा
रोहा (समीर बामुगडे) :
शिवराज्य प्रतिष्ठान वसई-पालघर आयोजित शिवराज्य चषक २०२० भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ३२ संघांनी सहभाग घेतला होता. तसेच ही स्पर्धा शिवराज्य प्रतिष्ठानचे क्रीडा समिती प्रमुख नितीन भावे, निलेश मौले व पदाधिकारी आणि सर्व सभासद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली.
या स्पर्धेचे सुरुवात दीप प्रज्वलन तसेच छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक कोकरे क्रिकेट संघ महाड, द्वितीय क्रमांक गणेश क्रिकेट संघ टोळवाडी - महाड, तृतीय क्रमांक सोनघर - म्हसळा, मालिकावीर राहूल गणेश क्रिकेट संघ टोळवाडी, उत्कृष्ट गोलंदाज पियुष भावे (कोकरे), उत्कृष्ट फलंदाज आमिर नाडकर (कोकरे) अशा प्रकारे क्रिकेट संघांनी यश मिळविले.
शिवराज्य प्रतिष्ठानचे संस्थापकअध्यक्ष पुर्वांग तांदळेकर, उपाध्यक्ष रोहन गजमल, उपाध्यक्ष शरद शिगवण, सचिव मनोज जाधव, खजिनदार संजय वाघमारे, सर्व क्रीडाप्रमुख, पदाधिकारी आणि सभासद बंधू भगिनी उपास्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित आर्डे यांनी केले. तसेच शेवटी शिवराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक/अध्यक्ष यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे, सर्व सहभागी संघांचे व विजयी संघांचे आभार मानले.