विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शी कलाविष्काराने होडगांव शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न


बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : रायगड जिल्हा परिषद शाळा होडगांव या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन अर्थात शैक्षणिक गुणवत्ता अंतर्गत विविध गुणदर्शन सोहळा माणगांव पंचायत समितीचे माजी सभापती सुजीत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


कार्यक्रमाच्या सुरवातीला सुजीत शिंदे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. तर होडगांव ग्रामपंचायतीचे उपसरपंच शंकर खाडे, ग्रामपंचायत सदस्या साक्षी शिगवण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश गोटेकर, उपाध्यक्षा मानसी सुतार, जागृती सुतार, सेजल साळवी, जयदेव म्हस्के, बाळाराम जाधव, सामाजिक कार्यकर्ते इंजि. सुशील कदम, लक्ष्मण कदम, दगडू शिर्के इत्यादी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.


सदर कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शी कलाविष्कारांचे एकापेक्षा एक प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली. त्यामुळे कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत प्रेक्षकांनी आपली उपस्थिती कायम ठेवली होती.
या कार्यक्रमासाठी या शाळेचे माजी मुख्याध्यापक सचिन कदम सर आवर्जून उपस्थित राहिले होते. सदर कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उर्मिला प्रभाकर मोरे, सौ. पल्लवी मनिष पाटील, श्री. पवार सर, श्री. पाकलवाड सर यांनी अथक परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाला गावातील सर्व आजी माजी विद्यार्थी, पालक , ग्रामस्थ आणि महिला मंडळ यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Popular posts from this blog