कोकण रेल्वेची पहिली महिला सारथी 'कोकणकन्या' प्रिया तेटगुरे  


माणगांव (महेश शेलार) :
आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने काम करत आहे. त्या आता अबला नसून सबला झाल्या आहेत, "ती" आता फक्त "चुल आणि मुल" या उक्तीपूर्ती मर्यादित राहीलेली नाही. याची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेतच, घरचा गाडा चालविणाऱ्या महिला आज सर्व प्रकारची वाहने सहजी चालवितात. मोटरसायकल, रिक्षा, कार, बस, विमान आणि रेल्वे सुध्दा चालवित आहेत. विशेष म्हणजे आपल्या रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील साळवे गावची सुकन्या प्रिया बाबुराव तेटगुरे कोकणरेल्वेत इंजिन चालक झाली आहे. याचा सर्व कोकणवासियांना अभिमान वाटत असून सोशल मिडियावर सध्या या कोकणकन्येचे जोरदार कौतुक होत असुन तिचे ट्रेन चालवितानाचे फोटो व्हिडीओ क्लिप सध्या माणगांवकरां मध्ये चर्चेचा विषय बनला आहे.


लोक म्हणतात "कोंकणची चेडू चालवता रेल्वे इंजिन; कोकणाक तिचों अभिमान असा." याबाबत थोडक्यात मिळविलेली माहीती अशी की, गेले वर्षभर प्रशिक्षण पूर्ण करुन आता प्रिया बाबुराव तेटघुरे ही कोकणची कन्या रेल्वे चालविते. ती कोकण रेल्वेच्या रत्नागिरी हेडक्वार्टरला रुजू आहे. तिचे वडिल माणगांव रेल्वेस्थानकात बुकिंग क्लार्क म्हणून कोकण रेल्वेत कार्यरत असून ते माणगांवला राहत आहेत. त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला असता त्यांनी आपल्या या कर्तृत्ववान मुली बद्दल मोठ्या अभिमानाने माहीती दिली आहे की, त्यांचे मुळ गांव माणगांव तालुक्यातील साळवे हे आहे, तिथे त्यांचे घर, भाऊबंद आहेत. ते १९९४ ला रत्नागिरी येथे कोकणरेल्वे मध्ये नोकरीस लागले त्यामुळे तिकडे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास राहिल्याने त्यांच्या या कर्तृत्ववान एकुलत्या एक मुलीचे प्रियाचे संपूर्ण शिक्षण रत्नागिरीलाच झाले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.


ती अशी कि प्रियाही रत्नागिरीच्या गोगटे काॅलेजची विद्यार्थीनी असल्याचेही त्यांनी सांगितले. इंजिनियरींगचे शिक्षण घेतलेली ही मुलगी धाडसी आहे. कारण या क्षेत्रात मुलींनी काम करणे खरच अवघड आहे. हीच गोष्ट रायगड वासियांना कुतुहलाची वाटत असून त्यांना या मुलीचा अभिमान वाटत आहे. नुकतेच बँगलोर ते मैसुर अशी राज्यराणी एक्सप्रेस महिला पथकाने चालविली असल्याचे वृत्त ही आहे. अशाप्रकारे निम्न पदा पासून उच्च पदा पर्यंत अगदी पंतप्रधान, राष्ट्रपती, परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्री, मंत्री, प्रशासनसेवा, समाजसेविका, डाॅक्टर, शास्त्रज्ञ, शिक्षीका, सैन्यदल,शेतीव्यवसाय अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या या खऱ्या अर्थाने रणरागीणी, विरांगणा महिलांना प्रोत्साहन मिळायलाच हवं, त्यांच्या पाठीशी कुटूंबाने आणि समाजाने खंबीर पणे उभं रहायला हवं अशी कामगीरी पुजाने केली असल्याच्या प्रतिक्रीया समाजातून उमटत आहेत.

Popular posts from this blog