महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हायचे असल्यास गृह उद्योगाशिवाय पर्याय नाही - चंद्रकांत मोहिते


रोहा (समीर बामुगडे) :
ग्रामीण महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हायचे असल्यास गृह उद्योगाशिवाय पर्याय नाही असे मत मुरूड पंचायत समितीचे उपसभापती चंद्रकांत मोहिते यांनी मांडले. ग्राम संवर्धन सामाजिक संस्था आणि मुरूड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वळके यांच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वळके, ताडवाडी, ताडगाव, सातीर्डे, शिरगाव आणि येसदे गावांतील महिला बचत गटांसाठी दोन दिवसीय ग्रामोद्योग प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन मुरुड पंचायत समितीचे उपसभापती चंद्रकांत मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी ग्रुप ग्रामपंचायत वळके सरपंच किशोर काजारे, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, खजिनदार व प्रशिक्षक प्रशांत पाटील उपसरपंच विजय म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य हरेश पाटील, महादेव मोरे,जयवंत पाटील सदस्या शमिता चवरकर,गीता सावंत, रजनी भगत,सुनंदा पाटील जयवंत चवरकर,माजी सरपंच जनार्दन भगत, माजी ग्रा. पं. सदस्या गुलाब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


या शिबिरात साध्या मेणापासून दैनंदिन वापरातील मेणबत्या व जेलीवॅक्सपासून फॅन्सी आर्टिफिशियल मेणबत्या बनविणे, कपडे धुण्याची डिटर्जंट पावडर बनविणे, अगरबत्ती बनविणे व रेडिमेड अगरबत्ती आणून सेंटेड अगरबत्ती पॅकींग करून विक्री करणे, फिनाईल बनविणे यांचे प्रशिक्षण देण्यात आले. या सर्व घरगुती व दैनंदीन वापरातील वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण प्रशांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर आणि मंगेश ठाकूर यांनी दिले.

Popular posts from this blog