ऐन रंगपमचमीच्या दिवशी दोन तरूणांचा अपघाती मृत्यू 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कळमजे गोद नदीच्या पुलावरील हे ठिकाण दिवसेंदिवस डेंजर झोन बनत चालले आहे



बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : ऐन रंगपमचमीच्या दिवशी शिवशाही बस व दुचाकीमध्ये भीषण अपघात होऊन २ जण मृत्यूमुखी पडण्याची घटना घडली आहे. या संबंधी माणगांव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. १३ मार्च रोजी रात्री १.३५ वा. च्या सुमारास माणगांव जवळील कलमजे पुलावर फिर्यादी किरण बाबुराव नरे वय २८ वर्ष रा. विहा मांडवा ता. पैठण हे त्यांच्या ताब्यातील शिवशाही बस क्र. एम एच ०९/ एफएल ०१९९ ही घेऊन त्यात प्रवासी वाहतूक करत असताना माणगांव बस स्थानक येथे १.३० वा. येऊन बस स्थानकामध्ये नोंद करून माणगांव एस टी स्थानक येथून प्रवाशी घेऊन नालासोपाराकडे जात असताना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव कलमजे पुलावर आले. त्यावेळी मुंबई बाजूकडून माणगांव बाजूकडे येत असलेली मोटारसायकल क्र. एम एच ०६ बी क्यू ५७८४ यामाहा कंपनीची आर वन फायू ही त्यावर बसलेले ओमकार कृष्णा मोंडे वय २५ व शिरीष नरेश ढवळ वय २० दोघे रा. पेण समोरून येऊन फिर्यादी यांच्या बसला धडक दिली. या अपघातात मोटारसायकल स्वार व त्यांच्यापाठीमागे बसलेला असे एकूण दोघे रोडवर पडुन गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्युमुखी पडले. त्यामुळे हे ठिकाण दिवसेंदिवस डेंजर झोन बनत चालले आहे.


सदर अपघाताची नोंद माणगांव पोलीस ठाणे येथे फेटल मोटार अपघात रजि नं. ०९/२०२०  करण्यात आली असून पुढील तपास  माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार भोजकर हे करीत आहेत.
ऐन रंगपंचमीच्या दिवशी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कळमजे पुलावर माणगांव तालुक्यातील पेण तर्फे तळे या गावातील या दोन तरूणांचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर व संपूर्ण माणगांव तालुक्यासह पेण तर्फे तळे गावावर दुःखाची शोककळा पसरली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगांव शहराजवळ असलेल्या या कळमजे गोद नदीच्या पुलावर आजवर अनेक प्रकारचे छोटे मोठे अपघात झालेले आहेत. या ठिकाणी काही वर्षांपूर्वी प्रवाशांनी भरलेली खाजगी व्होल्व्हो बस नदीत कोसळून अनेकांचे अनमोल प्राण या गेलेले आहेत. शिवाय या ठिकाणी अलिकडेच एसटी महामंडळाची बस रात्रीच्या अंधारात पुलाच्या कड्यावरून खाली पडली होती. सदरची घटना ताजी असताना या ठिकाणी हा अपघात झाला आहे. त्यामुळे हे ठिकाण दिवसेंदिवस डेंजर झोन होत चालले आहे. या गंभीर बाबीचा गांभीर्याने विचार करून संबंधित विभागाने या ठिकाणी योग्य ती उपाययोजना करावी.

Popular posts from this blog