जमावबंदी आदेशाचे उलंघन केल्यामुळे गुन्हा दाखल
खेळताच क्रिकेट, आठ जणांची पडली विकेट
माणगांव (उत्तम तांबे) :
माणगाव तालुक्यातील डोंगरोली गावामधील आठ तरुणांनी एकत्र येऊन रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केलेल्या जमावबंदी आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना या महामारी रोगाची लागण सध्या जगभर पसरली असल्यामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे . या परिस्थितीला सामोरे जात असताना सतर्क राहण्यासाठी सरकारने जे निर्देशन जारी केले आहेत त्याचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. परंतु काही ठिकाणी या आदेशांचे उलंघन होताना दिसत आहे. अशीच एक घटना २६ मार्च २० रोजी माणगांव तालुक्यातील डोंगरोली येथे घडली आहे. या गावाती भागेश डोंगरे, नथुराम डोंगरे, सिद्धार्थ डोंगरे, संतोष डोंगरे, महेश डोंगरे, चंदकांत डोंगरे, प्रमोद डोंगरे, हरेश डोंगरे हे तरुण एकत्र जमून क्रिकेट खेळत होते . ही आताच्या परिस्थिती नुसार एक प्रकारची हयगईची व घातक कृती आहे, जी एक प्रकारे कोरोना हा संसर्गजन्य आजार पसरविण्याची परिस्थिती निर्माण केली होती.
कोरोना विषाणूची साखळी तोडून हा आजार नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीचे आदेश जारी केले होते. या दरम्यान डोंगरोली येथील तरूण एकत्र येऊन क्रिकेट खेळत होते. या तरुणांनी जमावबंदी आदेशाचे उलंघन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा रजि.नं. ६४/२०२० भा.दं.वि. कलम १८८, २६९, २७० महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१, ३७ (३), १३५ अन्वये माणगांव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दरम्यान जमावबंदी आदेशाचे उलंघन होऊ नये व कायदा व सुव्यवस्थाचे पायल व्हावे याकरिता माणगाव पोलीस निरीक्षक आर. जे. इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. म्हात्रे तसेच सहाय्यक फौजदार वाटवे पुढील दक्षता घेत आहेत.