वंचित बहुजन आघाडीचे महासचिव सागर भालेराव यांच्या वडिलांचा द्वितीय स्मृती दिन महाड श्रामनेर संघाच्या समवेत साजरा 


बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : शुक्रवार दिनांक १३ मार्च २०२० रोजी वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा महासचिव आयुष्यमान सागर भालेराव यांचे वडील आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते दिवंगत महेंद्र राघू भालेराव यांचा द्वितीय स्मृती दिन महाड येथे साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम महाड चवदार तळे येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. सदर स्मृती दिनास श्रामनेर शिबिरातील संघनायक भन्ते सुमेधबोधी आणि त्यांचा भन्ते संघ उपस्थित होता.

सदर कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीच्या कोकण निरीक्षक तथा महाराष्ट्र राज्य महिला महासचिव सुमनताई कोळी आणि वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा अध्यक्ष विश्वतेज साळवी, श्रीहर्ष कांबळे रायगड जिल्हा सदस्य तसेच वंचित बहुजन आघाडी सर्व रायगड जिल्हा पदाधिकारी यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा माणगांव तालुका आणि रायगड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.


सदर कार्यक्रमा मध्ये दिवंगत महेंद्र राघू भालेराव यांच्या श्रद्धांजली प्रसंगी बोलताना सर्वांनी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव सागर भालेराव यांच्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या जीवनातील संघर्षांची आठवण करून देत श्रद्धांजली अर्पण केली. अनेक धर्मगुरू, भन्ते आणि मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

Popular posts from this blog