डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान 


इंदापूर (संजय जाधव) :- या प्रतिष्ठानच्या सौजन्याने आदरणीय श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इंदापूर कार्यक्षेत्रातील शासकीय कार्यालयांच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.


ही स्वच्छता मोहिम 'स्वच्छ भारत अभियानाचे' महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी नियुक्त केलेले स्वच्छतादूत डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.


डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे एक सेवादायी समाजाभिमुख उपक्रम राबविणारे प्रतिष्ठान आहे. सामाजिक बांधिलकी आणि समाजऋणांची जाणीव ठेवून हे प्रतिष्ठान सातत्याने समाजोपयोगी उपक्रम साकारत आहे. त्यामध्ये वृक्षारोपण आणि संगोपन, शैक्षणिक साहित्यांचे विनामूल्य वाटप, रक्तदान शिबीरे, आरोग्य निदान व उपचार शिबीरे, पाणपोई निर्मिती इत्यादी उपक्रम राबविले जात आहेत. अस्वच्छतेमुळे परिसर व पर्यावरणवर वाईट परिणाम होतात. तसेच अनेक साथीचे रोग बळावण्याची शक्यता उभी राहते. हा धोका टाळायचा असेल तर स्वच्छता करून परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.


याचाच एक भाग म्हणून इंदापूर शहरात ग्रा. पं. कार्यालय, बसस्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्र तळाशेत, बाजारपेठ व मुख्य रस्ते परिसर यांची साफसफाई करण्यात आली. यासाठी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्रीसदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामाची शिस्त व नियोजन चांगल्या प्रकारे करण्यात आले. 

Popular posts from this blog