जीवे मारण्याच्या हेतूने गोवंश तस्करी प्रकरणी ४ आरोपींवर गुन्हा दाखल
माणगांव (प्रतिनिधी) :
माणगांव पोलीस ठाण्यात चंद्रकांत गठाणी (वय ४१) सध्या राहणार जयकर स्मृती सोसायटी, आरे रोड, गोरेगांव पश्चिम मुंबई याने दिलेल्या फिर्यादीनुसार माणगांव तालुक्यातील निळगूण गावच्या हद्दीत एका गोडाऊन मध्ये तीन ते पाच वर्षाची सात गायीची वासरं अंदाचे किंमत रुपये ५५०००/- होईल अशी चोरून आणून ठेवल्याची घटना दि. १९ मार्च २०२० रोजी घडली आहे. त्यामुळे गोवंश तस्करी प्रकरणी माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती दिनांक १९ मार्च रोजी ३:३० वाजण्याच्या सुमारास नीलगुण गावच्या हद्दीत आरोपी १) पप्पन, २) फराग, ३) अकबर, ४) गुड्डू , पूर्ण नाव माहीत नाही. या चार जणांनी गोवंशाचीची कत्तल करण्याच्या उद्देशाने यूटिलिटी पीक अप च्या सहाय्याने गायीचे सात वासरू एम. एच. ०१ सी व्ही ८४८८ महिंद्रा पीक अप गाडी व एम एच ०६ बी जी ०३९० टेम्पो मध्ये घालून चोरून आणले व गोडाऊन मध्ये जीवे मारण्याच्या हेतूने बांधून ठेवले. तरी या गोवंश तस्करी प्रकरणी माणगांव पोलीस ठाणे मध्ये गुन्हा रजि. नं. ५९/२०२०, भा. दं. वि. कलम ३७९, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५, ५ (अ), ५ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.