माणगांव येथे क्रांती नगर रहिवासी मित्रमंडळातर्फे पहिली रेल्वे पायलट प्रिया तेटगुरे यांच्यासह अनेकांचा सत्कार 


माणगांव (इंद्रनिल पाटील) : क्रांती नगर रहिवासी मित्र मंडळ, क्रांती नगर महिला मंडळ आणि क्रांती नगर आठवडा बाजार स्थानिक समिती यांच्या माध्यमातून क्रांती नगर माणगाव येथे होळी महोत्सवानंतर श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंडळाच्या वतीने विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, हळदीकुंकू, संगीत खुर्ची, ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार, तसेच संपूर्ण माणगांव तालुक्यासह साळवे गावची शान कोकण रेल्वेची लोको पायलट कोकणरत्न,
कोकण कन्या सौ. प्रिया तेटगुरे यांचा सत्कार सोहळा आजोजित केला होता.


यावेळी हळदीकुंकू कार्यक्राला महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे अॅड. राजीवजी साबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य. प्रभाकर उभारे माजी पंचायत समिती सभापती सचिन बोंबले विरोधीपक्ष नेते नगरपंचायत माणगाव. तसेच मानकर वकील, कोकण रेल्वे पायलट सौ. प्रिया तेटगुरे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच संपूर्ण क्रांती नगर मंडळ कार्यकारिणी मोठ्या संख्येने उपस्थित होती.


माणगांव शहरातील क्रांती नगर रहिवासी मित्र मंडळाच्या वतीने होळीनंतरच्या पुजेची ही परंपरा वर्षानुवर्षे अथकपणे मनोभावे जपली जात आहे. या मंडळाच्या माध्यमातून उत्सव आणि परंपरा अखंडपणे जपली जात असल्यामुळे या मंडळाचा माणगांवमध्ये विशेष नावलौकीक आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष अॅड पंकज खामगांवकर, उपाध्यक्ष शिवश्री भुषण सिसोदे, कार्याध्यक्ष इंद्रनील पाटील, सचिव आदर्श मोरे, सहसचिव राहुल पाटील, खजिनदार शंकर उभारे, सह खजिनदार विवेक दांडेकर, सहसचिव मयूर गुरव, नागेश पाटील, संतोष साळुखे, सुरेश पाटील, जगदीश जाधव, बळिराम मोरे, राजेंद्र मराठे, गोपिनाथ पवार, रघुनाथ बगडे, राजाराम सिसोदे, योगेश पवार, शंकर जाधव, व्यंकटेश जाधव, नाना धायगुडे, संतोष साळुंखे, बबन पाटील, रमेश मोरे, दिपक मोरे, प्रकाश पाटील, अरविंद दोशी, रामचंद्र इंगावले, दिनेश बगडे आणि मंडळाच्या सर्व महिला पदाधिकारी व सदस्य यांनी प्रचंड मेहनत घेतली. अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.


Popular posts from this blog