मॅथेमॅटिक्स ओलंपियाड स्पर्धेत कुमार पार्थ नागेश पाटील याला सुवर्णपदक
माणगांव (इंद्रनिल पाटील) :
नुकत्याच झालेल्या मॅथेमॅटिक्स ओलंपियाड 2020 ते 2021 स्पर्धेमध्ये कुमार पार्थ नागेश पाटील याने सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या घवघवीत यशा मागे त्याचे आई-वडील व संपूर्ण शाळेचा सहभाग होता. पार्थ इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत आहे. तो माणगाव मधील प्रसिद्ध मानली जाणाऱ्या लीड स्कूल चा विद्यार्थी आहे.
पार्थच्या आई-वडीलांशी जवळ संपर्क साधला असता त्याची आई श्रेया पब्लिक स्कूल येथ मुख्याध्यापिका म्हणून काम करते तर वडील दापोली कृषी विद्यापीठ येथे अधीक्षक म्हणून काम करतात. त्यामुळे कालानुरूप होणारे शैक्षणिक बदल लक्षात घेऊन त्यांनी आपल्या पाल्याला अधिकाधिक स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी उस्फूर्तपणे प्रतिसाद व समजावून सांगितले.
त्याचप्रमाणे अनेक पालकांना आपल्या मुलांना आतापासून स्पर्धापरीक्षांची ओढ लावा असा संदेश दिला. यामधून मुलांची बौद्धिक पातळी वाढते त्याचप्रमाणे मुलांना एक ओढ निर्माण होते. आणि मुले पुढे मोठे होऊन यूपीएससी एमपीएससी परीक्षा सहज पार करू शकतात असा विश्वास पार्थच्या आई-वडिलांनी व्यक्त केला आहे.