बारावीच्या हिंदीचा पेपर व्हॉट्सअपवर, ८ जणांविरुद्ध गुन्हा 

जालना : जालन्यातील परतुरमध्ये बारावीची हिंदी विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याने खळबळ उडाली आहे. परतूर शहरातील लालबहाददूर शास्त्री विद्यालयात हा प्रकार समोर आलाय. शाळेतील शिक्षकांनीच हा प्रकार केल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ७ जणांना ताब्यात घेतलंय. तर एक जण फरार झालाय.

लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयातील शिक्षक व्हॉट्सएपवरून प्रश्नपत्रिका झेरॉक्स सेंटर चालकाला पाठवून काही विद्यार्थ्यांमार्फत कॉप्या पुरवण्याचे काम करत असल्याच समोर आले आहे.

ही माहिती मिळताच परतूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन एका शिक्षकासह ७ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. परतूर पोलीस या कटात सहभागी असलेल्या एका पर्यवेक्षकांचा शोध घेत असून तो पर्यवेक्षक फरार झालाय.

Popular posts from this blog