अलिबाग पोलीसांनी अवघ्या २० मिनिटात हरविलेल्या मुलाचा शोध घेतला
रायगड (किशोर केणी) :-
कु. आर्या शेठ नावाचा ०९ वर्षाचा मुलगा विद्यानगर-अलिबाग येथून हरविल्याबाबत त्याची आई रेखा शेठ यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात पोलीस नाईक निगडे यांच्याकडे तक्रार दिलेली होती.
सदरची माहिती पोलीस निरिक्षक श्री. कोल्हे यांना सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय कर्मचारी मार्फत हद्दीतील सर्व व्हॉटस्-अप ग्रुपमध्ये संदेश पाठविण्यात आले. तसेच बिटमार्शल, दामिनी पथक व सरकारी वाहनाने चालक सावंत व पो.शि./काळे यांना हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आले. त्याप्रमाणे पथकांनी विविध ठिकाणी मुलाचा शोध घेतला असता, कु. आर्या हा वरसोली बिच येथे सापडला. त्यानंतर अलिबाग पोलिसांनी अवघ्या २० मिनीटातच आर्या यास त्याच्या आईकडे सुखरुप दिलेले आहे.