विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी आमदार अनिकेतभाई तटकरे यांची नियुक्ती
रायगड (किरण बाथम) :
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी नवीन नियुक्त्यांची घोषणा केली. यावेळी कोकण स्थानिक स्वराज्या संस्थांमधून निवडून आलेले आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या नावाची विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी घोषणा करण्यात आली. गोपीकिसन बाजोरिया, डॉ. सुधीर तांबे, प्रा. अनिल सोले यांचीही या पदी घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, विधानपरिषदेचे सभागृहनेते म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाची घोषणा सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज केली.